Share

सामना सुरु असताना पोलार्डने धवनला दिली ‘मांकडिंग’ चेतावणी; व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दहावे षटक सुरु असताना मुंबईचा अष्टपैलु खेळाडू पोलार्डने धवनला चेतावणी दिली. केरॉन पोलार्ड दहाव्या षटकातील दुसरा चेंडु टाकण्यासाठी धाव घेउ लागला. त्यावेळी स्टीव्ह स्मिथ स्ट्र्राइकवर होता तर नॉन स्ट्रायकर एंडवर शिखर धवन हा होता. मात्र धवन चेंडु टाकण्याअगोदर धवन क्रिझच्या बाहेर गेला. तेव्हा पोलार्डने धवनला मांकडींग नुसार बाद करण्याचा इशारा दिला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओवर समींश्र प्रतिक्रीया उमटत आहे. जर त्यावेळी धवनला आउट केले आसते तर सामन्याचा निकाल कदाचीत वेगळा असु शकला आसता. असे मुंबईचे समर्थक म्हणत आहेत. तर काही लोकांनी पोलार्डच्या खेळ भावनेवर प्रश्न उचलले आहेत. आयपीएलमध्ये याअगोदरही एकदा आर अश्विनने जोश बटलरला मांकडींगद्वारे बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!