Share

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! निम्ण तेरणा प्रकल्पातून मिळणार पाणी

Published On: 

🕒 1 min read

लातूर : निम्ण तेरणा प्रकल्प वरील सिंचनासाठी खरीप हंगाम २०२१-२२ मधील पिकांना पाणी देणे आता सोपे होणार आहे. प्रकल्पाच्या सर्व लाभधारकांना खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये संबंधीत प्रकल्पातील पाणी साठा उपलब्धतेनुसार प्रकल्पीय पीक रचनेनूसार पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पातील पाणी साठा व पीक रचना तसेच प्रकल्प निहाय देण्यात येणाऱ्या पाणीपाळी संबंधीत शाखा कार्यालयास पाहयला मिळेल. पाणी पाळीच्या तारखा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्या नंतर जाहिर करण्यात येतील. शासनाने सुधारीत केलेल्या नमुन्यात संबंधीत शाखा अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सादर करावेत. कमी पाण्यात येणारी खरीप हंगाम पिके व लाभक्षेत्रातील प्रवाही वरील उभा उस कालावधी ०१ जूलै २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ राहील.

ज्या जमिनीसाठी पाणी मागणी करावयाची आहे तो त्या जमिनीचा मालक अथवा समाईक मालक असला पाहीजे. ज्या मूदतीसाठी पाणी अर्ज दयावयाचा आहे. त्या कालावधीत ती जमीन त्याचे वहीवाटीस असावी. पाणी अर्जा सोबत मागील थकबाकी पुर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी. पाणी अर्जासोबत ७/१२ उतारा किंवा खाते पूस्तीका सादर करावी. अशी माहिती लातूर पाटबंधारे विभागाने दिली आहे.

कालव्यावरील उपसा सिंचन परवाना धारकांने त्याचे मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी घ्यावे कालव्याच्या पुच्छ ते शिर्ष या प्रमाणे सिंचन नियोजन असल्यास मंजूर कालावधी सोडून मोटारी चालू ठेवल्यास सिंचन अधिनियम १९७६ चे कलम ९७ नुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे, मोटारी जप्त करणे, पाणीपरवाना रद्य करणे व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य ठरेल याची नोंद घ्यावी. शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या प्रचलीत पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात येईल. त्यावर 20 टक्के स्थानिक कर लावला जाईल. नियोजित साठयापेक्षा जास्त पाणी सिंचनासाठी वापरता येणार नाही. असे देखील लातूर पाटबंधारे विभागाने सांगितले

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!