नवी दिल्ली : अफगाणिस्तानात आता तालिबानची सत्ता असून तालिबानच्या दहशतीमुळे तेथील नागरिक देश सोडून पलायन करीत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणलेजात आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानात असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांनाही भारतात आणले जात आहे.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय काबूल विमानतळावर जमा होत असून आता त्यांनी परत मायदेशी आणण्यासाठी दररोज दोन विमानांच्या उड्डाणांना अमेरिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. काबूल विमानतळावर सध्या अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. त्याच्यामार्फत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना पुन्हा भारतात आणले जात आहे.
परंतु आता अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांना तेथून सोडवण्याची मागणी श्रीलंकेने भारताकडे केली आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना सोडवणे ही श्रीलंकेची प्रथमिकता आहे. त्यासाठी भारताने सहाय्य करावे, अशी अपेक्षा श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
दरम्यान, सद्यस्थितीस अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो सैन्याद्वारे रोज २५ विमाने उड्डाण घेत आहेत. अमेरिकेची मुख्य उद्देश अफगाणिस्तानमध्ये अडकेलेल्या आपल्या नागरिकांना आणि अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना देश सोडायचा आहे, त्यांना वाचविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलाच्या विमानांद्वारे नागरिकांना काबूल विमानतळावरून बाहेर काढले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जादु टोण्याच्या नावाखाली फसवणूक ; आरोपीला पोलिस कोठडी
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
- भावा-बहिणीच्या अतूट नात्याची शंभरी; बारामतीतील या जोडीची होतेय चर्चा
- मिशन रेसक्यू : भारताला काबूलमध्ये दररोज दोन विमान उड्डाणांना मिळाली परवानगी

