🕒 1 min read
मुंबई : भाजप नेत्यांच्या आणि पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तब्बल २६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल करून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.हा प्रकार २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत घडला आहे.
राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला. फेसबुक पेज सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब पोस्टेड बाय धनंजय जोशी, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय अतुल अयचित, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय सोनाली राणे, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र पोस्टेड बाय मधुकर वाघमारे, टकलु हैवान, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्ती तसेच फेसबुक अकाऊटधारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस. जोशी, नाना पंडीत, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाउंट धारक रुद्र देव, विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणावर भाजप नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही आहे. परंतु यामुळे आगामी काळात आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यातील वादंग पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पाकिस्तानची तिजोरी तर रिकामी आहेच, पण आता धान्याचे कोठारही जवळपास रिकामे झाले आहे’
- आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ससमोर आरसीबीचे तगडे आव्हान
- ‘आम्हाला दाभोळकरांचे संस्कार नको’;भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान
- पृथ्वी शॉच्या तडाख्यानंतर दिल्लीचा केकेआरवर ७ गडी राखुन दणदणीत विजय
- 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस,‘या’ जिल्ह्यात रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
