Share

मोठी बातमी : ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री वाबगावकर व्हेंटिलेटरवर! तर तब्बल २७ जणांना कोरोनाचा विळखा

Published On: 

सातारा : सोनी मराठी चॅनेलवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतील कलाकारांना कोरोनाचा विळखा बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच वृत्त मिळत आहे.

या मालिकेचे शूटिंग साताऱ्यात सुरु होत. आता या सेटवरील तब्बल २७ कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी पार पडले. यावेळी मुंबईहुन आलेल्या एका डान्स ग्रुपमुळे कोरोनाचे प्रसरण झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेत्री अलका कुबल व अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेच्या प्रमुख भूमिकेत आहेत. तर या मालिकेच्या निर्मात्या स्वतः अलका कुबल आहेत. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आल्यानंतर शूटिंगला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता शूटिंग दरम्यान कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!