Share

अक्षयच्या ‘गोरखा’ सिनेमात मोठी चूक; माजी लष्कर अधिकाऱ्याने आणून दिले निदर्शनास 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. सध्या अक्षयच्या आगमी ‘गोरखा’ चित्रपटाची देखील चर्चा होत आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. मात्र या चित्रपटातील पोस्टरमुळे सोशल मिडीयावर अक्षय ट्रोल होत आहे.

या पोस्टरमध्ये एक चूक असल्याची माहिती माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी अक्षय कुमार यांना करून दिली आहे. त्यासंदर्भाच ट्वीट जोली यांनी केले आहे त्यात त्यांनी म्हंटले की, “प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी आहे. त्यामुळे तुम्ही या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. पण तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील खुकरी ही व्यवस्थित दाखवावी. खुकरी हे एक धारदार शस्त्र असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही तर खुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो”, यासोबत त्यांनी खुकरीचा फोटो देखील शेअर केला आहे.

त्यावर अक्षय कुमार याने लगेच रिप्लाय देऊन चूक दाखवून दिल्याबद्दल जोली यांचे आभार मानले आणि आम्ही शुटींग करतांना याची अत्यंत काळजी घेऊ असे अक्षय म्हणाला. सध्या या गोष्टीवरून सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा रंगली असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!