Share

सडक्या मेंदूच्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करा; पुण्यातील भाजप नेत्यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. याशिवाय हिंदू धर्मियांचा,भारतीय संघराज्याचा,न्यायपालिकेचा अवमान करणारी अनेक वक्तव्ये त्याने केली आहेत. देशभरातून या गोष्टीचा निषेध नोंदविला जात आहे.

दरम्यान, यावरून काल भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला होता. आज हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी यांना तातडीने अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी पुणे शहर भाजपच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे पोलीस कमिशनर ऑफिस येथे आज निवेदन देण्यात आले.

यावेळी माहापौर मुरलीधर मोहळ, शहर अध्यक्ष जगदिश मुळीक,आ मुक्ता टिळक, भिमराव तापकीर, प्रदिप रावत, सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.यावेळी शरजिल वर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!