Share

मंत्रालयातून ‘विशेष’ परवानगी घेऊन मुंबईचा उद्योजक २३ जणांसह महाबळेश्वरमध्ये; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असताना मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन एक बडा उद्योजक आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेला हा उद्योजक व त्याच्या कुटुंबियांसह २३ जणांवर जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबईतील मोठे व्यापारी वाधवा हे आपले कुटुंबीय आणि कर्मचारी अशा २३ जणांसह लॉकडाउनचे सर्व नियम धाब्यावर बसवून ५ मोटारगाड्यांमधून आज दुपारी महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. महाबळेश्वरमधील नागरिकांनी त्यांना आपल्या फार्महाऊसवर थांबण्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने त्यांना पाचगणीमध्ये उभारलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केले आहे अशी माहिती आहे.

लॉकडाउनचा आणि संचारबंदीचा आदेश तोडल्यामुळे वाधवा कुटुंबावर कारवाई करीत असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. या उद्योगपतीने महाबळेश्वरला येण्यासाठी मंत्रालयातून विशेष परवानगी मिळवली होती.

सातारा येथे करोनाचे सहा रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर सातारा व कराड येथे उपचार सुरु आहेत. तर दररोज अनेक रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात येत आहेत. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापासून महाबळेश्वरातील पर्यटन बंद आहे. स्थनिकांशिवाय इतरांनी परिसर सोडून जावे असे आदेश प्रशासनाने काढले होते.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली चौकशीची घोषणा – 

आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवर दिली आहे. ते म्हणाले, ‘वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!