मुंबई : भाजपला धक्का देत शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना केली. यानंतर, या विसंगत विचारधारा असलेल्या पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही अशी टीका भाजप नेत्यांनी केली.
आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आली असून अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेतील स्थानिक नेत्यांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या मुत्सद्देगिरीचा आरोप देखील या काळात करण्यात आला. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचं वारंवार समोर आलं पण राज्य पातळीवरील नेत्यांनी सरकारला स्थिर ठेवले.
येत्या काळात अनेक महानगरपालिकांच्या निवडणूक येत असून नेत्यांची आणखी डोकेदुखी वाढणार असं दिसत असतानाच काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला आहे. माणगाव-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे वर्चस्व वाढणार आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वारंवार देशात स्वतःचा कचरा करून घेतल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘संजय राऊत यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं’
- अर्णबच्या पत्नीचं थेट सर्वोच्च न्यायालयालाच पत्र; म्हणाली, ‘माझ्या पतीला…’
- सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे- जयंत पाटील


