🕒 1 min read
नवी दिल्ली : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. सोमवारी अर्णबच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने दिलासा न देता न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले.
उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता, अर्णब गोस्वामीची पत्नी सॉम्यब्रता रे गोस्वामीने सुप्रीम कोर्टाला चिठ्ठी लिहिली आहे. ज्यामध्ये तिने ज्येष्ठ अधिवक्ता आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सुप्रीम कोर्टाच्या सरचिटणीसांना पत्र लिहून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आक्षेप घेतला आहे.
गुह्यांत दवे यांनी अर्णब प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. संदर्भात अर्णब गोस्वामीची पत्नी सॉम्यब्रता रे गोस्वामीने थेट सुप्रीम कोर्टालाच पत्र लिहलं आहे.
सॉम्यब्रताने लिहिलं आहे की, ‘मी दुष्यंत दवे यांची पत्र वाचले, मी हैराण आहे, हे फार भीतीदायक आहे. मी दवे यांना ओळखत नाही, तसेच मी त्यांना कधीही भेटलेही नाही. परंतु, ज्याप्रकारे दवे माझ्या पतीच्या याचिकेला सिलेक्टिव्ह टार्गेट करत आहेत. त्याचं उत्तर माझ्याकडून हे असेल की, जेव्हा अनेक प्रकरणांना कोर्टासमोर प्राधान्य देण्यात येतं तेव्हा हे शांत का बसतात.’ असा सवाल करत दवे यांच्या प्रश्नांवरून सर्वोच्च न्यायालयाला दाद मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वारंवार देशात स्वतःचा कचरा करून घेतल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- अभिनेता प्रभासचे टॉलीवूड मध्ये अठरा वर्षे पूर्ण; #18GloriousYearsOfPrabhas हॅशटॅग ट्रेंड…
- सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
