🕒 1 min read
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
दरम्यान, बिहारच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवल्यानंतर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.कालपासून बिहार निवडणूक आणि तेथील मुख्यमंत्री पदाबाबत आपली मते व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर राणे यांनी जोरदार टीका केली.
माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले,“बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेला बोलायचा अधिकार काय? बिहारमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं, ते मुख्यमंत्रिपदावरुन बोलणार. संजय राऊत यांना या विषयावर बोलण्याचा काय अधिकार? त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. संजय राऊत यांची किंमत काय आहे समाजामध्ये? संजय राऊत एकदा तरी समाजातून निवडून आले आहेत का? संजय राऊत यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवू देत. संजय राऊत आणि निवडणूक यांचा काही संबंध नाही” असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘वारंवार देशात स्वतःचा कचरा करून घेतल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
