इंग्लंड : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.
मात्र, सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आधीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि फिरकीपटू मिचेल सेंटनर यांना दुखापत झाल्याने न्यूझीलंडच्या संघात चिंतेचे वातावरण निर्माण झले आहे.
केन विल्यमसनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या हाताचा कोपर दुखावला होता. विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबचा निर्णय हा सामन्याच्या आधी घेतला जाईल. तर मिचेल सेंटनर हा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही अशी माहिती न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ७९ लाख दहा हजार दोनशे साठ रुपये रुग्णांना परत करा, रुग्ण हक्क संघर्ष समितीची मागणी
- कोल्हापुरात सर्वच व्यापारी-दुकानदारांना अनुमती द्या, अन्यथा…; धनंजय महाडिकांचा इशारा
- देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं ; अशोक चव्हाणांचा टोला
- लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप
- राज्यात आज १६,५७७ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी, तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

