भारताविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आफ्रिकन संघाला मोठा धक्का!; ICCने सुनावली शिक्षा

नवी दिल्ली : भारत विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) स्लो ओव्हर रेटसाठी दक्षिण आफ्रिकेला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शनिवारी सांगितले की, टेम्बा बावुमाच्या संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकला. ही बाब लक्षात घेऊन सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी हा दंड निश्चित केला.

ICC ने जारी केलेल्या निवेदनानुसार, “संघातील सदस्यांसाठी ICC आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार (किमान ओव्हर-रेटच्या दंडाबाबत) प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी खेळाडूच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बावुमा यांनी आरोप स्वीकारला असल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नसल्याचे ICC ने म्हटले आहे.

मैदानावरील पंच मरैस इरास्मस आणि एड्रियन होल्डस्टॉक, तिसरे पंच बोंगानी जेले आणि चौथे पंच अलाउद्दीन पालेकर यांनी शुक्रवारी सामन्यानंतर हे आरोप केले. दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी हा सामना सात गडी राखून जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेत मालिका खिश्यात घातली.

महत्वाच्या बातम्या: