वाराणसी : शिक्षण आणि शैक्षणिक वातावरणाच्या बाबतीत जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये बनारस हिंदू विद्यापीठाचे नाव घेतले जाते. आता बनारस हिंदू विद्यापीठात या वर्षीपासून भूत पळवण्याची विद्या शिकवणारा कोर्स सुरू होणार आहे. तथापि, या कोर्समध्ये अनिष्ट बाबी न सांगता या भूतविद्येची तर्कशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मागच्याच वर्षी सुरू होणार होता कोर्स
‘भूत विद्या’ या कोर्सला सन 2019 मध्ये शैक्षणिक परिषदेने विद्यापीठाकडून हिरवा कंदील दिला होता. परंतु यानंतर कोरोना संसर्गामुळे प्रवेश पूर्ण न झाल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे हा कोर्स सुरू होऊ शकला नाही. बीएचयूने सुरू केलेला हा कोर्स आंतरराष्ट्रीय परवान्याने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात (भूत विद्या) सध्या यासाठी 7 जागा निश्चित केल्या आहेत. कालांतराने संख्या वाढवता येईल, असे सांगितले जात आहे. या कोर्ससाठीचा अभ्यासक्रम बीएचयूने विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. यात प्रवेश घेणारे विद्यार्थी अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
भूतविद्या आयुर्वेदाच्या 8 शाखांपैकी एक
भूत विद्या कोर्सबाबत विद्यापीठाचे म्हणणे आहे की, हा अभ्यासक्रम आयुर्वेदाच्या 8 मुख्य शाखांपैकी एक आहे. अभ्यासाबरोबरच प्रॅक्टिकल परीक्षा, अंतिम परीक्षा आणि प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे. या कोर्समध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दोन डझनहून अधिक इच्छुकांचे अर्ज देश-विदेशातून आले होते. त्यातून सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
बीएचयूच्या आयुर्वेद विद्याशाखेत या कोर्ससाठी स्वतंत्र वर्ग तयार केले जातील. यात जुलै 2020 मध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार होती. 2020 मधील लॉकडाऊनमुळे हा कोर्स विलंबाने सुरू होईल. तथापि, याक्षणी हा कोर्स पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचा अभ्यासक्रम वेबसाइटच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पाहता येईल.
संसदेतही गाजला होता मुद्दा
अभ्यासक्रमाचा भाग होण्यापूर्वी भूतविद्येच्या कोर्सवर प्रचंड वादविवाद झालेला आहे. 2019 मध्ये त्याचा अभ्यास सुरू करण्यास संसदेमध्ये मान्यता देण्यात आली. संसदेच्या मान्यतेनंतर या कोर्सचे स्वरूप तयार करण्यात आले आहे. हा कोर्स आयुर्वेदाच्या 8 भागांपैकी एक आहे. आयुर्वेदचे 8 भाग म्हणजे कायिक विज्ञान, बालरोगशास्त्र, शस्त्रक्रिया, शाल्यक म्हणजे नाक-कान-घसा रोग, अगदतेज, रसायना विद्या, भूत विद्या आणि वाजीकरण विद्या असे आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

