🕒 1 min read
वढु : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शनिवारी (९ जानेवारी) वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही मोजके धारकरी देखील होते. तब्बल ७ वर्षांनी त्यांनी या स्थळाला भेट दिल्याचे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
भिडे हे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी आल्याचे समजताच शिक्रापूर पोलिसांनी त्यांना तिथे थांबण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेऊन पुढच्या दौऱ्यावर प्रस्थान केले. त्यांनी वाजेवाडी (ता.शिरूर) येथील एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या या दौऱ्यासंबंधात शिक्रापूर पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. तर, सोशल मीडियामध्ये त्यांच्या या भेटीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी छत्रपती संभाजी महाराजच्या समाधीस्थळाची भेट दिली आहे. दरम्यान, कोरेगाव-भीमाप्रकरणी त्यांचा हात असल्याचा काही संघटनांनी दावा केला होता. कोरेगाव-भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरेगाव-भीमा शौर्यदिनावेळी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा निर्णय
- चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी; सचिन सावंतांची टीका!
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- #भंडारा जिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाची चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करा- दरेकर
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
