Share

राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ माजी प्रदेशाध्यक्षाने सोडली पवारांची साथ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून गुहागरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी अखेर घरवापसीचा निर्णय घेतला आहे.

भास्कर जाधव यांनी १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करनार असल्याचे आज पत्रकार परिषदेत घेवून घोषित केले. गुहागर आणि चिपळूणमधील राष्ट्रवादीचे काही पंचायत समिती सदस्य, गुहागर तालुक्यातील ७३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार असून, त्यातील भास्कर जाधव यांचा शिवसेनाप्रवेश निश्चित झाल्याने हा राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का ठरणार आहे.

याच वेळी भास्कर जाधव म्हणाले की, शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी सोडली. माझं म्हणणे मी लिखित स्वरूपात पवार साहेबांकडे दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच सर्व गुहागर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य ७२ गावाचे सरपंच यांच्यासह सर्वांचा राष्ट्रवादीला रामराम करत आपल्या सोबत प्रवेश करणार राष्ट्रवादी सोडत असताना आपण कुठल्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा फोटो अथवा झेंडा जो असेल तो कार्यकर्ते यांनी आपल्या कार्यालयात जमा करावा त्याची कोणतेही नासधूस होता कामा नये असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात दोन धक्के बसले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे हे आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत दाखल होतील. तर भास्कर जाधव हे १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आज त्यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!