Share

Ravi Rana । “गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले” ; रवी राणा यांचा गंभीर आरोप

Published On: 

(Ravi Rana) अमरावती : अमरावतीमध्ये पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा विरुद्ध प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. ‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू (Bachhu Kadu)  यांनी राणा दाम्पत्यावर केली होती. बच्चू कडूंच्या या टीकेला रवी राणा (Ravi Rana) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असल्याचा आरोप देखील रवी राणा यांनी केला आहे.

रवी राणा म्हणाले, गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूने आरोप करताना दहा वेळा विचार करावा. विधानसभा आली तर त्यांना दमडी पाहीजे, राज्यसभा आली तर त्यांनी दमडी पाहीजे. कुण्या सरकारला पाठिंबा द्यायचा तर दमडी पाहीजे. गुवाहाटीला जायचं आहे तर दमडी पाहीजे. बच्चू कडू यांचे जीवन पैसा आहे. असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले आहेत.

पुढे ते म्हणाले, मला असं वाटते बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. याला कुठल्याही प्रकारची मान मर्यादा नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो ते फक्त तोडीसाठी करतो. तोडीबाज म्हणून त्याची ओळख असल्याचं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावलाय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. रवी राणामध्ये धमक आहे. रवी राणा किराणा वाटतो, गरीबांवर उपचार करुन देतो. मुलांना शिक्षणासाठी मदत करतो. आदिवासी कुटुंबाना रवी राणा स्वत:चा पगार देतो, असंही ते म्हणाले.

काय म्हणालेत बच्चू कडू?

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली. गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!