Eknath Shinde | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना सोमवारी अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. एवढंच नाही तर त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील त्रास झाला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं होतं. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची भेट घेत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली आहे.
संजय शिरसाट यांची अँजोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. शिरसाट यांची प्रकृती उत्तम असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी फोन करुन शिरसाटांच्या परिवाराला धीर दिला होता. त्यानंतर रुग्णलयात दाखल होत शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. तसेच त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील त्रास जाणवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी लगेच सूत्र फिरवली आणि शिरसाट यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादला तातडीने एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यानेच शिरसाट यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल केलं होतं. शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना औरंगाबाद मध्ये सिग्मा रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना दिलासा! समता पक्षाची याचीका न्यायालाने फेटाळली
- Ravi Rana । “बच्चू कडू सोंगाड्या, तोडीबाज, नौटंकीबाज” ; रवी राणा यांचा आक्रमक पलटवार
- Eknath Shinde Group | “मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो” ; शिंदे गटातील आमदाराचे विधान
- Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ED-CBI कडून चौकशी करण्याची मागणी; मुंबई हायकोर्टात आज सुनावणी
- Sandipan Bhumare | संदिपान भुमरे यांच्यावर दुःखाचं डोंगर ; जवळच्या व्यक्तीचं निधन


