Share

भारतीय जनता पक्षाचा आत्मा ईव्हीएममध्ये : सचिन सावंत

Published On: 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील मतदारांना विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा पर्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र विधानमंडळाने कायदा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

“विधानसभा आणि विधानसभा अध्यक्षांनी काय करावं हे नियम घालून देण्यात आलेले आहेत. निवडणूक हा विषय केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असतो. आपला देश सुधारणेकडे चालला आहे. त्यामुळं मतपत्रिकेवरुन आपण ईव्हीएम आणलं. आता उलटा प्रवास करण्याचा प्रयत्न दिसतोय.” अस वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं होत. तसेच अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलेले आहे. “भारतीय जनता पक्षाची पोटदुखी वेगळी आहे त्यांचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता दाखवण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याचं मूळ ईव्हीएम आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संविधानिक पदावर आहेत त्यांना जे अधिकार प्राप्त झालेल्या त्या अन्वये त्यांनी सध्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला सूचना केली आहे. मतपत्रिकांचा वापर व्हावा यासाठी कायदा करावा. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची देखील भूमिका आहे.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!