🕒 1 min read
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पुण्यात आहेत. शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यानं मनसे आणि भाजपचं सूत जुळणार का, याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीची चर्चा सुरु होताच कॉंग्रेसने आता राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करणाऱ्या अभिनेत्रीचं भाजप समर्थन करतं आणि अशा पक्षासोबत तुम्ही जाणार का? असा सवाल भाई जगताप यांनी राज ठाकरेंना केला आहे.
एक कृपा शंकर गेले म्हणजे सर्व उत्तर भारतीय गेले असे होत नाही. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक नेते हे उत्तर भारतीय आहेत. मुंबईत 18 ते 19 टक्के उत्तर भारतीय आहेत असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आता मनसे त्यांना कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
