Share

भारतनानांचा वारसा मुलगा चालवणार, विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालकेंची बिनविरोध निवड

Published On: 

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भारत भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आमदार भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना ही संधी देण्यात आली.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.दरम्यान, सहाय्यक निबंधक एस. तांदळे यांनी कारखाना स्थळावर संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेससह सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, कुस्तीतून वर आलेला हा पट्ठ्या जीवनातील लढाईत हरला.

भारत भालके हे 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!