Share

आयपीएल 2021 च्या हंगामातील सर्वोत्तम कॅच; सोशल मीडियावर होतेयं कौतुक

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : आयपीएल 2021 मध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांच्या फरकाने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघ 7 गडी बाद 125 धावा करू शकला. अशा स्थितीत पंजाबच्या गोलंदाजांनी चमकदार गोलंदाजी करताना हैदराबादला हे छोटे लक्ष्य गाठू दिले नाही आणि आपल्या संघाला 5 धावांच्या फरकाने विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 17 धावा करायच्या होत्या पण जेसन होल्डर आणि भुवनेश्वर कुमारची जोडी तशी करू शकली नाही. या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे.

दरम्यान, या सामन्यात हंगामातील सर्वोत्तम झेल पाहायला मिळाला हा झेल पर्यायी क्षेत्ररक्षक जगदीशा सुचितने घेतला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले विकेट गमावले आणि 88 धावांच्या आत 5 विकेट पडल्या. जेव्हा दीपक हुडा फलंदाजीला आला, तेव्हा त्याच्याकडून काही मोठे फटके अपेक्षित होते पण 13 धावा केल्यावर झेलला बळी पडला.

डावाच्या 16 व्या षटकात दीपक हुड्डाने जेसन होल्डरच्या कव्हरवर खेळण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उभ्या असलेल्या जगदीशा सुचितने डावीकडे चमकदार उडी मारली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला. सुचित 11 खेळाडूंमध्ये नव्हता, तो काही वेळापूर्वीच पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर आला होता. त्याच्या सुपर झेलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!