मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.
या दरम्यान न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने या सामन्याविषयी आपले मत मांडले आहे. केन म्हणाला की,’ भारतीय संघ हा एक उत्कृष्ट संघ आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर या संघाची क्षमता सर्वानी पाहिली होती. या क्रमवारीत भारतीय संघ क्रमवारीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट संघासोबत दोन हात करण्याची आमच्याकडे उत्कृष्ट संधी आहे.’ असे केन विल्यमसन म्हणाला.
२००८ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलताना तो म्हणाला की,’वेगवेगळ्या स्पर्धेत आणि वेगवेगळ्या स्तरावर आम्ही एकमेकांविरुद्ध खेळलेलो आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. या सामन्याच्या वेळी एकत्र मैदानात जाणे, नाणेफेक हे खुप चांगल असणार आहे’. २००८ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना झाला होता. तेव्हा भारताचे नेतृत्व विराट तर न्यूझीलंडचे नेतृत्व विलियम्सन करत होता.
महत्त्वाच्या बातम्या
- डाउनलोडिंगच्या आधीच धोकादायक फाईलची मिळणार सूचना
- मोदी सरकारची अन्यायी दरवाढ; मराठवाड्यात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन!
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
