Share

Shahrukh Khan | ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी किंग खान पोहोचला माता वैष्णोदेवीच्या दारात

Published On: 

🕒 1 min read

Shahrukh Khan | कटरा: बॉलीवूडमध्ये सध्या एका मागून एक फ्लॉप चित्रपट होत चालले आहे. या स्थितीमुळे चित्रपट निर्माते आणि अभिनेते नाराज आहेत. चित्रपटातील अभिनेत्यांपासून ते निर्मात्यापर्यंत चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) आपल्या आगामी चित्रपट पठाण (Pathan) च्या प्रदर्शनापूर्वी माता वैष्णो देवीच्या दरबारात हजेरी लावताना दिसला आहे. किंग खानचा ‘पठाण’ हा चित्रपट पुढील महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार मोहीम बराच काळ सुरू आहे.

बॉलीवूडमध्ये रोज नवीन काही ना काही घडत असते. दरम्यान, नुकतेच आमिर खानचे पूजा करतानाचे फोटो समोर आले होते. आमिर खान या फोटोमध्ये पत्नी किरण रावसोबत कलश पूजन आणि आरती करताना दिसत होता. या फोटोमध्ये आमिर खानने कपाळावर टिळा लावलेला असून आमिर खान प्रोडक्शन हाऊसमध्ये तो पूजा करताना दिसला होता. तर दुसरीकडे बॉलीवूड किंग खान मध्यरात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत माता वैष्णवीच्या दरबारात हजेरी लावताना दिसला आहे. वैष्णोदेवीच्या दरबारात किंग खानला कुणी ओळखू नाही, म्हणून त्याने तोंडाला मास्क आणि चष्मा लावला होता.

अलीकडे सोशल मीडियावर ‘पठाण’ या चित्रपटाबाबत बहिष्कार मोहीम सुरू होते. ही मोहीम शांत व्हावी आणि चित्रपट हिट व्हावा यासाठी किंग खान वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचला आहे, असे लक्षात येत आहे. शाहरुख खानचा याबाबतीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. हा व्हिडिओ वैष्णोदेवी मंदिराचा आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काळ्या रंगाची हुडी घातलेली असून, त्याचे डोळे झाकलेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा चेहरा जरी दिसत नसला, तरी त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षेमुळे तो शाहरुख खान असल्याचा असा दावा केला जात आहे.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपट ‘पठाण’ ‘जवान’ आणि ‘डंकी’मुळे चर्चा आहे. शाहरुखने नुकतेच सौदी अरेबियामध्ये ‘डंकी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांना दिली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!