टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. आपण केलेल्या कामाची पोचपावती जनतेला देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, ‘सरकारच्या कारभारात टाचणी पडल्याच्या घटनेचीही मला माहिती मिळते. त्यामुळे कोणता कार्यकर्ता विरोधात काम करत आहे, हे समजत नाही, असे समजू नका, असे मुंडे म्हणाले.
तसेच ज्यांना विरोधात काम करायचे आहे त्यांनी सांगून बाहेर पडा, सोबत राहून विश्वासघात करू नका’, असे मुंडे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, ‘जय-पराजय काहीही होईल हृदयात राहा, डोक्यात राहू नका. यावेळी चूकीला माफी नाही’, असे मुंडे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना मुंडे म्हणाले, ‘विधानसभेची निवडणूक ही भाजपाच्या सत्ता, पैसा आणि भावनिकता विरूद्धची माझी सामान्य माणसाच्या विकासाची लढाई आहे. मतदार संघातील प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे, असे मुंडे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176711219434024960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176704011656978432?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176524142704615424?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

