🕒 1 min read
औरंगाबाद : सुरक्षा रक्षकांना मारहाण करुन कंपनीतील केबल व हॅमरिंग ड्रील मशीन असा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांनी सादर केलेला नियमीत जामीन अर्ज, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शुक्रवारी फेटाळला.
अमोल काशीनाथ खरात (२०, रा. कमळापुर रोड, रांजनगाव शे.पुं ता. गंगापुर) आणि सय्यद अनिस सय्यद हबीब (२१, रा. हिदायत नगर, वाळुज) अशी आरोपींची नावे असुन त्यांना २१ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली होती.
प्रकरणात वरुन शाम कुंभकर्ण (२२, रा. हरिषा रेसिडेन्सी, साउथसिटी) याने फिर्याद दिली. त्यानूसार, रिलायन्स जीओ कंपनी कार्यालयाच्या आवारात १६ ऑगस्ट रोजी रात्री पवन लंबे आणि शिवाजी पोपळघट हे दोघे सुरक्षा म्हणुन कर्तव्य बजावत होते. मध्यरात्री नंतर कंपनीच्या कम्पाउंडची जाळी तोडून आत शिरलेल्या तिघांनी चोरट्यानी लंबे व पोपळघट यांना मारहाण करुन केबल व हॅमरिंग ड्रील मशीन असा सुमारे एक लाख ४८ हजारांचा ऐवज एका लोडींग रिक्षात (क्रं. एमएच-२०-डीसी-१५८५) चोरुन नेला. प्रकरणात एमाआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणी सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करा’ ; मुख्यमंत्र्यांचे आदेश
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- कोरोना इफेक्ट! शिक्षण क्षेत्रावर अवकळा; अकरावी प्रवेशातही गडबड गोंधळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
