श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेह-लडाखचा दौरा केला. पंतप्रधान मोदींनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांशी संवाद साधला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे. लेह-लडाख दौऱ्यात मोदींनी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावतदेखील लेह दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांचा हा दौरा सुरू असतानाच गववानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीने मोदींना मोठे आवाहन केले आहे.आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने हुतात्मा संतोष बाबू यांच्या पत्नी बी. संतोषी यांच्याशी संवाद साधला असता सुरुवातीला त्या भावूक झाल्या, त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हुतात्मा संतोष बाबू यांच्या पत्नी बी. संतोषी म्हणाल्या,आपल्या देशाचं लष्कर खूप शूर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे जवानांचा उत्साह वाढेल. तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यासाठी बळही मिळेल. मी मोदीजींना आवाहन करते की काहीही झालं तरी आपल्याला तिथून विजयी होऊन परतायचं आहे.
मी आशा करतो मनमोहन सिंग यांचा सल्ला पंतप्रधान विनम्रतेने ऐकतील – राहुल गांधी
तर गोपीचंद पडळकर भाजपमधून बाहेर पडतील, जानकरांचा दावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने साधला लोकप्रतिनिधींशी संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

