नवी दिल्ली : भारत-चीन हिंसक चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी, “भारतीय सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही,” असं विधान केलं होतं. या विधानावरुन गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण द्यायची वेळी सुद्धा पंतप्रधान कार्यालयावर आली होती. नेमकं सीमेवर काय झालं या बाबत नेमकी माहिती कोणाला माहिती नाही आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कुठलाही भ्रामक प्रचार सक्षम नेतृत्वाला पर्याय ठरत नाही, असं देखीन मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं, आज रुग्णालयातून घरी परतणार
आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील. देशाच्या नेतृत्त्व करणाऱ्यांच्या खांद्यावर कर्तव्य पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात या सगळ्यासाठी पंतप्रधान उत्तरदायी असतात. त्यामुळे आपली वक्तव्य किंवा घोषणांमुळे देशाच्या सामरिक किंवा भूप्रदेशीय हितसंबंधांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी पंतप्रधानांनी अत्यंत सजग राहिले पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.
‘फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला व पडला’
तसेच सध्याच्या परिस्थितीत सरकारमधील सर्व घटकांनी संकटाचा सामना करण्यासाठी किंवा परिस्थिती आणखी चिघळणार नाही, यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे. पंतप्रधान आणि केंद्र सरकारने त्यांच्यासमोरील आव्हानांचा सामना करावा. देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांचे बलिदान सार्थ ठरवावे. सरकार यामध्ये कमी पडले तर तो जनमताचा विश्वासघात ठरेल, असेही मनमोहन सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे.
डॉक्टर मनमोहन सिंह की चीन पर दो टूक व प्रधानमंत्री को स्तिथि से निपटने के लिए दृढ़ व दूरदर्शी राय-
“हम न तो उनकी धमकियों व दबाव के सामने झुकेंगे और न ही अपनी भूभागीय अखंडता से कोई समझौता स्वीकार करेंगे।
प्रधानमंत्री को अपने बयान से उनके षडयंत्रकारी रुख को बल नहीं देना चाहिए…” pic.twitter.com/oB6wmYnXlS
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 22, 2020
यानंतर आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सल्ला विनम्रतेने ऐकतील अशी अशा व्यक्त केली आहे. भारताच्या भल्यासाठी तरी मनमोहन सिंग यांचा सल्ला विनम्रतेने ऐकतील अशी अशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी की महत्वपूर्ण सलाह। भारत की भलाई के लिए, मैं आशा करता हूँ कि PM उनकी बात को विनम्रता से मानेंगे। pic.twitter.com/0QTewzmcyD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

