Share

भारतीय संघाच्या मदतीसाठी बीसीसीआयने लवकरात लवकर द्रविडला पाठवावे ‘या’ भारतीय दिग्गजाचा सल्ला

Published On: 

ऑस्ट्रेलिया : नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला.  ऑस्ट्रेलियाने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. सामन्यातील पहिले दोन दिवस आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघासाठी हा पराभव लाजिरवाणा आहे भारताचा हा पराभव न विसरण्यासारखा आहे.

भारताच्या या पराभवानंतर सर्वत्र क्रिकेट पंडितांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून ,भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये मदत करण्यासाठी राहुल द्रविड यांना ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले गेले पाहिजे असा सल्ला दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना वेंगसरकर म्हणाले ,’ बीसीसीआयने लवकरात लवकर द्रविडला भारतीय फलंदाजांना मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाठवले पाहिजे. द्रविड यांच्यापेक्षा इतर कुठलाही व्यक्ती भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन परिस्थितीत कसे खेळावे याबद्दल योग्य मार्गदर्शन देवू शकत नाही. नेटमध्ये राहुल द्रविड यांची उपस्थिती भारतीय खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल ‘.

वेंगसरकर पुढे म्हणाले,’कोरोना वायरस मुळे एनसीए (राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी) मागील नऊ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे द्रविड यांच्याकडे कुठलेही अतिरिक्त काम नसेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, बीसीसीआय राहुल द्रविड यांना भारतीय संघासोबत पाठवून त्यांचा योग्य वापर करून घेवू शकते ‘. असा सल्ला दिलीप वेंगसरकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!