Share

बीसीसीआयचे सामनाधिकारी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन; सुरेश रैनाने वाहिली श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने तत्काळ ही स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित केली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) चे सामनाधिकारी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ओडिशातील भुवणेश्वर येथे एम्स रुग्णालयात त्यांनी आखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मृत्युसमयी प्रशांत यांचे वय ४७ वर्षे होते. ओडिशा क्रिकेट असोसीएशनने ट्विट करुन प्रशांत यांच्या मृत्युची माहिती दिली. काही दिवसापुर्वी ९ मे रोजी प्रशांत यांचे वडील रघुनाथ महापात्रा कोरोनामुळे निधन झाले होते.

प्रशांत यांनी ४५ प्रथण श्रेणी सामन्यात ३०.८४ च्या सरासरीने ५ शतके आणि ११ अर्धशतकाच्या सहाय्याने २१९६ धावा केल्या. देशांतर्गत स्पर्धेतील ४० सामन्यात त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते. भारताचा माजी क्रिकेटपटु सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी ट्विट करुन प्रशांत मोहापात्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!