Share

पक्ष घेईल तो निर्णय मान्य, इंदापूरच्या जागेवर आ. भरणेंनी मौन सोडले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: इंदापूर विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काँग्रेसने या जागेचा आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी देखील विद्यमान आमदार आपला असल्याने जागा सोडण्यास तयार नाही. यामध्ये आता आ. दत्तात्रय भरणे यांनी आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असून पक्ष घेईल तो निर्णय मान्य असल्याचं म्हंटल आहे.

दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या जागे संदर्भात मौन सोडत निर्णयाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांकडे टोलवला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. जागेचा तिढा वाढल्याने हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकसभेवेळी अहमदनगरमध्ये आघाडीत निर्माण झालेली परिस्थिती इंदापूरमध्ये देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून सुप्रिया सुळेंचा विजय सुखद केला होता. मात्र, इंदापूर राष्ट्रवादी कार्यकर्ते उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील यावर अडून बसल्याने या जागेचा पेच पवार कुटूंबापुढे निर्माण झाला आहे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मी मान्य करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्याने आता शरद पवार कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!