Share

फ्यूचर ग्रुपसोबतच्या करारावर बंदी, रिलायन्स रिटेलला मोठा झटका !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपसोबत 24,713 कोटी रुपयात करार करुन आपल्या व्यवसायाची विक्री केली होती. परंतु फ्यूचर ग्रुपने रिलायन्ससोबत करार करुन, आपल्यासोबत मागील वर्षी केलेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे, असं सांगत अॅमेझॉनने सिंगापूरमधील लवादात याचिका दाखल केली होती. यावर दिलेल्या अंतरिम आदेशात फ्यूचर ग्रुपला आपला व्यवसाय रिलायन्सला विकता येणार नाही. त्यामुळं आता रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या करारावर सिंगापूरमधील लवादने बंदी घातली आहे.

त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका बसला आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या करारावर सिंगापूरमधील लवादने बंदी घातली आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर जेफ बेजोस यांच्या अमेझॉन कंपनीच्या याचिकेवर लवादने हा निर्णय दिला आहे. अॅमेझॉनने मागील वर्षी किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपच्या फ्यूचर कुपन्स लिमिटेड या कंपनीमधील 49 टक्के भागीदारी खरेदी केली होती. याशिवाय फ्यूचर रिटेलमधील 7.3 टक्के वाटा देखील आहे. परंतु हा व्यवसाय किशोर बियानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज 24,713 कोटी रुपयात विकला. यानंतर अॅमेझॉनने सिंगापूरच्या लवादकडे दाद मागितली होती.

रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमधील झालेल्या कराराबाबत अॅमेझॉनचं म्हणणं आहे की, आमच्याकडे राईट ऑफ फर्स्ट रिफ्यूझल असेल, असं फ्यूचर ग्रुपसोबत झालेल्या करारात निश्चित झालं होतं. याशिवाय ही कंपनी इतर कोणत्याही प्रतिस्पर्धी ग्रुपसोबत करार करु शकणार नाही. रिलायन्ससोबत करार करताना फ्यूचर ग्रुपने या दोन्ही अटींचं उल्लंघन केलं आहे. अॅमेझॉनने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रिलायन्सकडून फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर भारतीय बाजारात स्पर्धा वाढण्याची भीती अॅमेझॉनला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!