🕒 1 min read
मुंबई : बांग्लादेशच्या दौऱ्यावर यजमान बांग्लादेशने श्रीलंकेचा सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिका खिशात घातली आहे. बांग्लादेशने दिलेल्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ केवळ १४१ धावापर्यंत मजल मारु शकला. याप्रकारे बांग्लादेशने श्रीलंकेचा १०३ धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयासह बांग्लादेशने आयसीसीच्या वनडे सुपर लिगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
बांग्लादेश क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे की बांग्लादेशच्या एखाद्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. आसीसीने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने ही लीग सुरु केली आहे. या यादीत ५० गुणासह बांग्लादेशचा संघ पहिल्या स्थानी विराजमान आहे. बांग्लादेशनंतर या यादीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ आहेत. या तिन्ही संघाचे गुण ४० आहे. धावगतीच्या आधारे इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
Bangladesh go to No.1 in the ICC Men’s @cricketworldcup Super League standings (powered by @MRFWorldwide) ????
Check full table ➡️ https://t.co/aKpQG5ZC8u pic.twitter.com/tbelUP1Jf6
— ICC (@ICC) May 25, 2021
आयपीएल स्पर्धेमुळे मागील काही महिन्यात भारतीय संघ एकही एकदिवसीय सामना न खेळल्याने या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. ही लीग सुरु झाल्यापासुन भारतीय संघाने ६ सामने खेळताना ३ सामन्यात विजय मिळला आहे. श्रीलंका या यादीत सर्वात शेवटी आहे. या विश्वचषकाचा यजमान भारत असल्याने या गुणतालिकेत भारताला कोणताही क्रमांक मिळाला तरी विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्यातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने सांगितल्या प्रशिक्षक ‘राहुल द्रविड’च्या आठवणी, म्हणाला..
- ‘कोरोना युद्धात काैतुकास्पद काम केलेल्या राज्यसरकारचे अभिनंदन करायचे सोडून, फडणवीस राजकारण करत आहेत’
- ‘हेमा मालिनी एक महान कलाकार आहे’; सावत्र नातवाने केले कौतुक
- ‘ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, अन्यथा महाराष्ट्रात प्रतिमोर्चे काढू’
- होम आयसोलेशनवर बंदी घालण्याचा निर्णय अव्यवहार्य; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
