🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगितीनंतर बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र या दौऱ्यात पृथ्वी शॉला संघात स्थान दिले नाही. यानंतर पृथ्वी शॉने गतकाळातील अनेक आठवणीना उजाळा दिला आहे. पृथ्वी शॉने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या बद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
२०१८ साली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ होता तर प्रशिक्षक हे भारताचे माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड हे होते. मुलाखतीत द्रविड यांच्याविषयी बोलताना शॉ म्हणाला की, ‘विश्वचषक स्पर्धेआधी २ वर्ष सोबत असताना राहुल सरांनी आमच्या कोणत्याच गोष्टी बदलण्यासाठी नाही सुचवल्या ना कोणत्या गोष्टी आमच्यावर लादल्या. ते नेहमी नैसर्गिक खेळी करण्यास प्रवृत्त करायचे. मानसीक गोष्टीवर चर्चा करण्यास त्यांचा भर असायचा. खेळताना कहीतरी ध्येय ठेवा आणि खेळण्याचा आनंद घ्या असे ते नेहमी सांगायचे’
यावेळी पुढे बोलतान शॉने राहुल द्रविडच्या शिस्तप्रियतेबद्दल सांगताना म्हणाला की ते असताना शिस्तीचे पालन करावेच लागत असे. अनेकदा आम्ही एकत्र जेवन करायचो असे यावेळी शॉ म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगीरीनंतर पृथ्वी शॉला भारतीय संघातुन बाहेर करण्यात आले. यानंतर शॉने स्थानीक क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळी करत पुनरागमन केले. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी ३८.५० च्या सरासरीने एकूण ३०८ धावा बनवल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- होम आयसोलेशनवर बंदी घालण्याचा निर्णय अव्यवहार्य; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी
- सुबोध कुमार जयस्वाल CBI संचालक झाल्याने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार?
- धक्कादायक ; आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची रोकड, एसीबीची कारवाई
- ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बळ,राज्य सरकारने केला ‘हा’ आदेश जारी
- सुबोधकुमार जयस्वाल यांची CBI संचालकपदावर नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
