Share

‘कोरोना युद्धात काैतुकास्पद काम केलेल्या राज्यसरकारचे अभिनंदन करायचे सोडून, फडणवीस राजकारण करत आहेत’

Published On: 

🕒 1 min read

पुणे – कोरोना युद्धात महाआघाडी सरकारने जे काैतुकास्पद काम केले आहे त्या बद्दल राज्यसरकारचे अभिनंदन करायचे सोडून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सतत राजकारण केले. मनाचा मोठेपणा दाखवत ‘राज्य सरकारच्या’ प्रयत्नांचा  पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठका, राज्य सरकारच्या गाईड लाईन्सची,विभागीय आयुक्त, कलेक्टर, मनपा आयुक्त व प्रशासन, मनपा चे सर्व आरोग्य अधिकारी यांनी केलेली अंमलबजावणी व घेतलेले श्रम यांचा त्यांनी खुले मनाने स्वीकार केला असता तर प्रगल्भ विरोधी पक्षनेता अशी प्रतिमा ते करु शकले असते..! पंरतु सतत डोक्यात संकूचित श्रेयदानादाचे राजकारण घेऊन वावरणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ती संधी गमवली असल्याची खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे राज्याचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी काल झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत केली.

पुणे श्रमीक पत्रकार संघाच्या सहकार्याने गुगल मीट च्या माध्यमातून करोना संसर्ग, सद्यस्थिती, पुणे शहर आणि लसीकरण या ज्वलंत विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तिवारी बोलत होते. पुण्यात येऊन पुणे महानगरपालिकेचे काैतुक करणा-या या वृत्तीचा आम्ही धिक्कार करतो. केंद्र सरकारचा ब-याच पातळ्यांवर असहकार असतांना, कामात खोडे घालण्याची वृत्ती वेळोवेळी सिद्ध होत असताना महाआघाडी सरकारने कोणत्याच पातळीवर त्रागा न करता संयमाने आणि सामंजस्याने परिस्थिती हाताळली. भाजप शासित राज्यांपेक्षा ही, महाराष्ट्राने राज्याची आर्थीक घडी न बिघडू देता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणली… केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांमुळे देखील राज्य सरकारला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार राज्यातील महाआघाडी सरकारला सतत अडचणीत आणण्याचा व कोंडीत पकडण्याचा प्रयत्नात आहे. पंरतू अशा कठीन परिस्थीतीत एकदिलाने, एकमनाने आणि एकविचारांनी काम करणे अपेक्षित असतांना विरोधी पक्ष नेता जबाबदारीने वागत नाही आहे. हे वर्तन ‘महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय वारस्याला’ धरुन नसल्याची टीका देखील तिवारी यांनी यावेळी केली.

तिवारी म्हणाले, उच्च न्यायालयाची चपराक दिल्यानंतर ही पुणे महानगरपालिका त्यांचा “डॅश बाोर्ड” अद्ययावत करीत नाही आहे. हे पुणे मनपाचे सपशेल अपयश आहे मुंबई महानगरपालिका जर डॅश – बाोर्ड अद्ययावत करु शकते तर माहिती-तंत्रज्ञानाचे हब असलेल्या पुण्याच्या महानगरपालिकेला ते का शक्य होत नाही. सर्वसामान्य नागरिक डॅश बोर्ड अद्ययावत नसल्याने हवालदिल होऊन मिळेत त्या हाॅस्पीटलमध्ये अव्वाच्या सव्वा पैसा मोजून रुग्ण भरती करीत आहे. डॅशबोर्ड वर योग्य वेळी योग्य बेड्स ची माहीती न मिळाल्यामुळे गरजूंना महागातील खाजगी हॅास्पीटल्स चे बेड्स मजबूरी ने घ्यावे लागत आहेत.. याचे बेड्स वाटपाचे खरेतर ॲाडीट होण्याची गरज आहे, असेही त्यांना सांगितले ..

पुण्याची करोना परिस्थिती आता नियंत्रणात येत आहे. ह्यात पुणे मनपातील भाजप सत्ताधारी एकमेव कौतुकाचे पात्र नसून आरोग्य यंत्रणा, आरोग्य मंत्री, संपर्क मंत्री इ. वेळोवेळी घेत असलेल्या आढावा बैठका आणि त्या बैठकांमधून होत असलेले सरकारचे निर्देश व मार्गदर्शन देखील प्रशंसनिय आहे. महाआघाडीच्या बैठकांमधून होणा-या मार्गदर्शक तत्वांवरच पुणे मनपा प्रशासकीय यंत्रणा काम करीत असतांना पुणे मनपातील भाजप सरकार केवळ एकटेच श्रेय कसे घेऊ शकते, असा खडा सवाल देखील गोपाळ तिवारी यांनी ‘पत्रकार परिषदेत’ उपस्थित केला.

तिवारी म्हणाले, पुणेकर सर्वसामान्य नागरिकांपासून, चाकरमानी, रोजदांरीवरील मजदूर ते पुण्यातील व्यापा-यां पर्यंत सर्वांनी ‘महाआघाडी सरकारच्या’ आवाहानास प्रतिसाद देत लाॅकडाऊनला पाठिंबा दिल्यानेच, आज रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज पुणेकर नागरीकांपासून व्यापा-यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या आर्थिक आवक वर पाणी सोडले आणि लाॅकडाऊन स्विकारला म्हणुन रुग्ण संख्या नियंत्रणात आली. हेच भाजप सरकार व्यापा-यांची डोके भडकवून लाॅकडाऊनला विरोध करत होते…!

तिवारी म्हणाले, लसीकरणा बाबत विचारलेल्या प्रश्नास ऊत्तर देतांना त्यांनी सांगितले की एकिकडे खाजगी हॅास्पीटल्स ना ६०० रू ने लस घेण्यास मोकळीक द्यायची, आणि दूसरी कडे मात्र सिरमला पुन्हा ‘त्यांच्या कडील हॅास्पीटल्स ची रीक्वायरमेंट’ मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवण्यास भाग पाडून, त्यास केंद्राच्या स्वतंत्र परवानगीची अट घालावी हे दुटप्पी वागणे भाजपने बंद करावे. पुणे मनपास सिरम इन्स्टीट्यूट’ राज्य सरकारच्याच नियंत्रित दरात पुणेकरांसाठी’ लस उपलब्ध करत असल्याची बाब स्तुत्य व स्वागतार्ह आहे… असेही त्यांनी सांगितले.. त्या करीताकेंद्राने लवकर पुणे मनपा प्रस्तावास मान्यता द्यावी अशी मागणी देखील केली…!

तिवारी म्हणाले, केंद्र सरकार आणत असलेला मदतीचा आर्विभाव तरी बंद करावा. चंद्रकांत पाटील यांनी भाजप 500 खाटांचे रुग्णालयाची घोषणा केली, प्रकाश जावडेकर यांनी देखील ११२१ व्हेंटिलेटर बाबत घोषणा केली, त्याची पुर्तता किती झाली..? ते अद्याप आलेले नाहीत.. केंदाने पाठविलेले व्हेंटीलेटर्स देखील नादुरुस्त आहेत, ते दुरुस्त करुन लवकरात लवकर उपयोगात आणू असे महापाैर आश्वासन देतात, परंतु ते वास्तवात दिसत नाही…!पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना तीवारी म्हणाले, रेड झोन आणि संसर्गाचा धोका ओळखून जे भाग रेड झोनच्या बाहेर आहेत अशा भागात लाॅकडाऊन 1 जून पासून शिथील करावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. लाॅकडाऊन हा एकमेव पर्याय नाही हे आमचे नेतृत्व राहूल गांधी यांची सुरवातीपासूनची भूमिका आहे.लाखांचा पोशिंदा रोजगार निर्मित ऊद्योग, व्यवसाय, व्यापार आदी टिकलाच पाहिजे.. असं देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!