Share

सोलापुरात बंदचा फज्जा! बाजार समितीत तुफान गर्दी

Published On: 

सोलापूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली आहे. मात्र सोलापूर येथे बंदचा फज्जा उडाला आहे.

सोलापूर येथे सर्व व्यवहार सुरळीत आहेत. तर बाजार समितीत मोठी गर्दी दिसून येत आहे. तर मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

तर पुणे येथे महाविकास आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळतो आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईतील अंधेरी आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबर रोजी तीनही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन या बंदला पाठींबा दर्शविला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!