दीपक पाठक/पुणे – देशातील मुस्लिम समुदायाशी संबंधित तिहेरी तलाक विधेयक प्रचंड वादळी चर्चेनंतर संसदेमध्ये मंजूर झालं आहे. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही केल्याने मुस्लिम समाजातून तीन तलाक कायमचाच हद्दपार झाला असून तीन तलाक देणं हा यापुढे गुन्हा ठरणार आहे.
राज्यसभेतही विधेयक मंजूर झाल्याने देशभरातील मुस्लिम महिलांना न्याय मिळाला असल्याची भावना मुस्लीम स्त्रिया व्यक्त करीत आहेत. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी आता एक पाऊल पुढे टाकत भारतात बुरखा बंदी करावी अशी मागणी केली आहे. हलाला, बहुपत्नीकत्व यासारख्या प्रथा बंद व्हाव्यात अशी अपेक्षा देखील देसाई यांनी ‘महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना केली आहे.
तिहेरी तलाकच्या विधेयकाला पाठिंबा दर्शविताना त्या म्हणाल्या की, ‘तिहेरी तलाक याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे होते, या विधेयकाच्या मंजुरीमुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय होणे बंद होईल. पुढे बोलताना देसाई यांनी भारतात समान नागरी कायदा लागू व्हावा अशी देखील मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून निवेदन देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
औरंगाबाद : भाजप लोकप्रतिनिधींंना अंधारात ठेऊन उद्योगमंत्र्यांनी घेतली बैठक
‘महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांनी गमावला’
पंकजा मुंडेंनी चालवला लोकनेत्याचा खरा वारसा, शेतमजुराच्या पोराच्या शिक्षणाला केली मदत
तिहेरी तलाकवरून घमासान : खा. पूनम महाजन यांच ओवेसींना ‘हे’ खरमरीत प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

