मुंबई : शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा यांची ओळख आहे. चंपासिह थापा यांचे शिंदे गटात जाणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो.
चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला एक भावनिक किनार आहे. कारण थापाला बाळासाहेबांची सावली म्हटले जात होते. गेली अनेक वर्षे बाळासाहेबांचा विश्वासू सेवक म्हणून चंपासिंह थापाकडे पाहिले जात होते. चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती होते. चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एवढी वर्ष बाळासाहेबांसोबत काम केल्यानंतर थापा यांनी उद्धव ठाकरेंसह न राहता शिंदे सोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
चंपासिंह थापा हे नेपाळचे असून 30 वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होता. मुंबईच्या कबड्डीत के. टी. थापा हे नाव खूप मोठे होते. त्यानंतर के. टी. थापा भांडुपचे नगरसेवक झाले. यावेळी के. टी. थापांच्या सोबतीने चंपासिंह थापा मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांचा सेवेकरी बनले. बाळासाहेबांनी थापा यांना कायम मातोश्रीवर ठेवण्याचे उद्धव ठाकरेंना सांगीतले होते. थापा यांना बाळासाहेबांनी कुटुंबातील सदस्याचा दर्जा दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Vinod Patil | “सरकार कुणाचंही असलं तरी तरुणांची मागणी तीच असेल”, विनोद पाटील
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता ‘या’ आठवड्यात येईल शेतकऱ्यांच्या खात्यात
- BJP | “जनाची नाही तर मनाची लाज बाळगा” ; भाजपचा आदित्य ठाकरेंना टोला
- Dhananjay Munde | लोकशाहीत भान ठेवून बोलावे ; धनंजय मुंडेंनी घेतला सावंतांच्या वक्तव्याचा समाचार
- Health Tips | साधे नाही तर मिठाचे पाणी रोज प्या, कारण आरोग्यासाठी आहे ते डबल फायदेशीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

