टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. वार फिरेल तसं विरोधी पक्षाचे आमदार टोपी फिरवू लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. भाजपच्या तोडाफोडीला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेस नवी रणनीती आखण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पवारांनकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर विधानसभेच्या जागेची चर्चा झाली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर बुधवारी हे चारही जण भाजपवासी झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजीमहिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. फक्त ४ नाही तब्बल ४० आमदार आमच्या संपर्कात आहे असं विश्वास गिरीश महाजन यांनी देखील व्यक्त केला आहे. यामुळे भाजप-सेना बळकट होताना दिसत आहे, मात्र आघाडी खिळखिळीत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
मनसे कॉंग्रेससोबत गेली तर उरले सुरलेले मतदारही दुरावतील : सुधीर मुनगंटीवार
सांगोल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘या’ युवा नेत्यानं धरली भाजपची वाट
आम्ही बहुमताचे सर्व विक्रम मोडीत काढणार : देवेंद्र फडणवीस
येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

