Share

‘भाजप हा खूप मजेशीर पक्ष, नेते सोडून ‘पीए’लाच तिकीट देतात’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. अशातच कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या तिकट वाटपाचा खरपूस समाचार घेतला आहे. लातूर जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा झाली. त्यात थोरात यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले.

‘भाजप हा खूप गमतीदार पक्ष आहे. पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापले. हे तिघेही मंत्रिमंडळात मोठे मंत्री होते. त्यांना तिकिट दिलं नाही आणि पीएला मात्र तिकिट देण्यात आलंय. भाजपनं तिकिट देण्यात चूक केली असेल. पण, जनता त्यांना निवडून देण्यात चूक करणार नाही.’ असा घणाघात थोरात यांनी केला.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार निवडणुकीचा रिंगणात आहेत. त्यांच्या या उमेदवारीवरून लातूर जिल्हा भाजपमध्ये रणकंद माजले आहे. याचाचं धागा पकडत थोरात यांनी मुख्यमंत्री आणि भाजपला फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182543372642209792?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182541555355152385?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!