मुंबई : दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात ठिकठिकाणी दूधआंदोलनाला सुरुवात केली आहे. अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘भिक नको घामाचे दाम द्या’ अस म्हणत शेतकरी आंदोलन करत आहेत.
आज ग्रामपंचायतवर प्रशासक उद्या मतदानाचा हक्क हिरावून घेणार का?
दरम्यान यानंतर दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक होणार असून मंत्री, शेतकरी संघटना तसेच प्रशाकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे ‘भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यांच्या काळात सलग 3 वर्षे दुधाचे दर कोसळले, सर्व शेतकरी 3 वर्षे आंदोलन करत होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले होते, शेवटी सरकार जाताना त्यांनी थोडी मदत केली, आमच्या सरकारने मागील 4 महिन्यांपासून दुधाच्या प्रश्नात लक्ष घातलंय’. असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या दुध आंदोलनाला लगावला आहे.
‘पवार साहेबांना हात जोडून विनंती आहे की श्रीरामाला आता तरी शांततेत विराजमान होऊ द्या’


