मुंबई : ‘कोरोनाचं संकट हे संपूर्ण मानवतेपुढील संकट आहे , हे एखाद्या महायुद्धासारखं आहे. यामध्ये शत्रू दिसत नाही, अदृष्य शत्रूसोबतची लढाई आहे. संपूर्ण जगात सुरु आहे,’ असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनाचं संकट हे एखाद्या महायुद्धासारखं आहे. यामध्ये अदृश्य शत्रूशी आपण लढत आहोत, याचा प्रसार थांबवणे, हे महत्त्वाचं असल्याचं देखील थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.
‘आपण आपली काळजी घ्यायची आहे. आपली काळजी घेणं, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आणि समाजाची काळजी घेण महत्त्वाचं. त्यामुळे जेवढा आपण लॉकडाऊन पाळू, एकमेकांशी संपर्क टाळू, तितकं यश लवकर मिळेल,’ असा विश्वास देखील थोरात यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारत सरकार देत आहे, महाराष्ट्र सरकार देत आहेत त्या सूचना पाळा, संयम पाळा. आपण आपल्या घरातच राहायचं आहे. कठीण काळ आहे, संकट आहे. पण, ते संपवायचं असेल, तर हे जे काही निर्देश आहेत ते पाळावे लागणार आहेत’, असं थोरात म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
