Share

बाळासाहेब सानप अजूनही संघाचे स्वयंसेवक : संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक येथे आज सकाळी भाजपचे बंडखोर नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची भेट घेतली. ही भेट बंद दाराआड झाली. त्यामुळे राऊत आणि सानप यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली याबाबत राऊत यांनी खुलासा केला.

या भेटीबाबत संजय राऊत म्हणाले की, पक्षांतर केल तरी सानप आमचे जुने मित्र आहेत. त्यासाठी मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच सानप अजूनही संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संघाचे संस्कार जाणार नाहीत, असे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान खासदार संजय राऊत कालपासून नाशिक शहराच्या दौ-यावर आहेत. शहरात शिवसेना नगरसेवक विलास शिंदे यांनी पश्चिम मतदारसंघात भाजप आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ती शमविण्यासाठी ते चर्चा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. याउलट राऊत यांनी भाजपचे बंडखोर आमदार बाळासाहेब सानप यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182626003102756864?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182625501011070978?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182623401703178240?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!