Share

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवरच कोसळले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (मिथुन दादा ) यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या शूटिंग दरम्यान मिथुन दादा यांची तब्येत अचानक खालावली. मसूरीमध्ये आऊटडोअर शूटिंग सुरू असताना ते सेटवरच कोसळले. त्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटामध्ये मिथुन दादा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी ही सगळी घटना घडली. निर्माते आणि सेटवरील सर्वांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये म्हणून मिथुन चक्रवर्ती आजारी असतानाही शूटिंग पुन्हा सुरु करण्याचं म्हणत होते. पण दिग्दर्शकांनी त्यांना आराम करण्याची विनंती केली. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी स्वत: माहिती याबद्दल माहिती दिली.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये मिथून चक्रवर्तींसोबतच अनुपम खेर, पुनित इस्सार यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. किसान आंदोलनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!