टीम महाराष्ट्र देशा : बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अजब, गजब बदल करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे गणितातील संख्या वाचन सोपे झाले की अवघड हा प्रश्नच आहे. कारण विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवणारे बदल पुस्तकात करण्यात आले आहेत. चालू वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासूनच हे बदल करण्यात आले आहेत. जोडाक्षर वाचताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते म्हणून हा बदल करण्यात आल्याचा निर्वाळा शिक्षणतज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी केला आहे.
गणिताच्या मराठी वाचनात आता संख्या वाचन करताना ३१ चा उच्चार एकतीस असा न करता, वीस एक असा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे बत्तीसचा उच्चार तीस तीन, तेहतीसचा उच्चार तीस तीन, संख्यावाचन करताना यापुढे विद्यार्थी ६१ या संख्येला एकसष्ट न म्हणता साठ एक म्हणतील, ६२ या संख्येला बासष्ट न म्हणता साठ दोन म्हणतील ९३ त्र्याण्णव असा उच्चार न करता नव्वद तीन असा उच्चार केला जाईल. १ ते १०० या ठिकाणी जिथे जोडाक्षर येते तिथे ती संख्या नव्या पद्धतीने वाचण्याची सूचना मंडळाने दिली आहे.
दरम्यान, संख्यावाचनात जे बदल केले गेले आहेत त्याची काहीही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. जे बदल केले आहेत ते शिकवताना आणि मुलांना उच्चारतानाही कठीण जाणार आहेत.
..तर जुन्या पद्धतीने जे शिकले आहेत त्यांना आम्ही त्यांचे उच्चार बदला असे सांगत नाही पण जसं पंचावन्न म्हणणं योग्य ठरेल तसंच पन्नास पाच म्हणणंही योग्य ठरेल असं मत मंगला नारळीकर यांनी मांडलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
