Share

एसटीच्या खासगीकरणाला बहुजन कर्मचारी संघाचा विरोध

Published On: 

औरंगाबाद : राज्यशासन आणि परिवहन महामंडळाकडून करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करण्यात यावे तसेच कोरोना काळात कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच कोटी रुपयांचा मोबदला देण्यात यावा. खाजगी बस ऐवजी महामंडळाने बस खरेदी करून सेवा देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या राष्ट्रीय ट्रेड युनियन राज्य शाखेने एक दिवसीय काळी फीत लावून आंदोलन करून निवेदन दिले.

संघटनेने २५० आगारात ३१ विभागीय कार्यालयात हे आंदोलन केले. यात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या सतरा संघटना, बामसेफचा एकोणावीस सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ३५८ तालुक्यात जिल्ह्यात एकाच दिवशी आंदोलन केले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या बस सेवेचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. एसटीने बस घेऊन त्यावर शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.

कंत्राटी भरती बंद करावी. कोरोना काळातील सर्व महिन्याचे वेतन देण्यात यावे कोरोना काळातील ५० लाख रुपयांचा विमा देण्यात यावा. कोरोनामध्ये जीव गमावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटींची आर्थिक मदत जाहिर करावी, महामंडळाने खासगी ऐवजी स्वत:च्या बसेस खरेदी कराव्यात यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष अमोल बनसोडे, उपाध्यक्ष प्रेमानंद कर्णे, महासचिव मिलिंद धुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!