Share

तुमचा 7/12 वाचवायचा असेल तर उद्याचा 8/12 अतिशय महत्त्वाचा – बच्चू कडू

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठींबा दिला आहे. बच्चू कडू हे शुक्रवारपासून दिल्ली आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन निघाले आहेत. चार दिवसांआधी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर परवा हजारो शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश मध्ये प्रवेश केला आहे. परवा या शेतकऱ्यांचा मध्यप्रदेश मधील बैतुल मध्ये दुसरा मुक्काम होता. यासाठी बैतुल मध्ये एक मंगल कार्यलय बुक करण्यात आले होते पण एन वेळेवर मध्यप्रदेश पोलिसांनी रहायला नकार दिल्याने हजारो शेतकरी हे शेतकऱ्यांचा शेतमाल असलेल्या वेअर हाऊस वर शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली.

तर, 7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच केली असून त्यांचा मोटारसायकल मोर्चा आज मध्यप्रदेशच्या भोपाळ वरून वरून रवाना होणार आहे. बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे.

या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!