Share

‘बंदला पाठिंबा देणारे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे’

Published On: 

मुंबई:- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी बिलाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंबरपासून शेतकरी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे यातच उद्या भारत बंद देखील शेतकऱ्यांनी पुकारला आहे.

दरम्यान, आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, एका बाजूला हि स्थिती असताना दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांवर भाजपाने निशाणा साधला आहे. या तिन्ही पक्षाचं शेतकरी प्रेम हे नकली आहे, असा आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

उपाध्ये यांनी ट्विटद्वारे पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘बंदला पाठिंबा देणारे सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना करोना काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणती मदत केली.’असं म्हटलं आहे.

शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीलं आहे, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!