मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आणि दिग्गज अभिनेत्री सायरा बानो ही बॉलिवूड जोडी सर्वांसाठीच प्रेमाचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही या दोघांचं प्रेम कायम आहे. कोरोना काळामध्ये अनेक दिग्गज कोरोनाच्या विळख्यात अडकल्याच दिसून आलं. त्याचबरोबर हे वर्ष सिनेसृष्टीसाठी अत्यंत वेदनादायी राहिले आहे.
या मध्ये आता ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक असल्याचं वृत्त आलं आहे. मात्र मागील काही वर्षांपासून दिलीप कुमार यांनी तब्येत ठिक नाही. सायरा बानो या अनेक वर्षांपासून आपल्या पतीची दिलीप कुमार यांची निष्ठेने काळजी, देखभाल करत आहेत.सायरा बानो यांनी नुकतंच दिलीप कुमार यांची हेल्थ अपडेट दिली आहे. त्यांनी दिलीप कुमार यांची तब्येत सध्या नाजूक झाल्याचं सांगितलं आहे. त्यांची इन्मूनिटी अतिशय कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
सायरा बानो यांनी सांगितलं की, सध्या दिलीप कुमार यांची तब्येत अतिशय अशक्त आहे. रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. अनेकदा ते हॉलपर्यंत येतात आणि लगेचच त्यांच्या खोलीत जातात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं सायरा बानो यांनी चाहत्यांना म्हटलं आहे. ‘मला त्यांची काळजी घ्यायला आवडतं. माझं त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. त्यांची सोबत असणं आणि त्यांच्यासोबत राहणं हेच माझ्यासाठी खूप आहे’ असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर्षी 2020 मध्ये, दिलीप कुमार यांच्या दोन भावांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.
महत्वाच्या बातम्या
- “नव्या संसदेसाठी इमारत २० हजार कोटी, खास विमानासाठी १६ हजार कोटी अन्…”प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर सडकून टीका !
- ‘काँग्रेस,राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी पवारांचे आत्मचरित्र वाचावे नंतर कृषी कायद्याला विरोध करावा’
- हार्दिक टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर, हरभजन सिंहकडून हार्दिकचं कौतुक
- ८ डिसेंबरचा ‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा – अशोक चव्हाण
- दिल्लीच्या आंदोलनात शेतकरी कमी दलालच जास्त- सदाभाऊ खोत

