पुणे : डिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. ‘ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
याचप्रमाणे विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली होती. 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जाहीर झालेल्या यादीत 68 गावातील 15 हजार 368 लोकांची नावं आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. यात 4500 जणांना आधार प्रमाणपत्र दिलं. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच आतापर्यंत 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर एक व्हिडीओ वायरल होत आहे, एसटी मध्ये रडणाऱ्या व्यक्तिला कारण विचारल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत बोलला २ लाख कर्ज होते आज माफ झाले… धन्यवाद महाविकास आघाडी सरकार…, असे म्हणत त्या शेतकऱ्याने सरकारचे आभार मानले आहे.
https://twitter.com/RealBacchuKadu/status/1235277117610393602?s=20
तसेच जलसंपदा आणि लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपल्या अभिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना टॅग केला आहे.
दरम्यान, साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्यानं आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या,’ असे आपुलकीचे आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. तर, पहिल्यांदाच कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी भावना नगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

